जीएसटी रिटर्न (gst return) भरण्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) अव्वल राहिले आहे. जीएसटीअंतर्गत महाराष्ट्रात नोंदणी केलेल्या एकूण व्यावसायिकांपैकी ९६ टक्के व्यावसायिकांनी जीएसटी रिटर्न भरला आहे. त्यापाठोपाठ गुजरात (gujrat) आणि राजस्थान (Rajasthan) या राज्यांचा क्रमांक आहे. गुजरात आणि राजस्थानमधील नोंदणी केलेल्या एकूण व्यावसायिकांपैकी ९५ टक्के व्यावसायिकांनी रिटर्न भरला आहे.
२ कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या देशातल्या ९२ टक्के करदात्यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षातील वार्षिक रिटर्न्स भरले आहे. एक जुलै २०१७ पासून देशात जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू झाला आहे. नोंदणीकृत व्यवसायांना वार्षिक रिटर्न्स जीएसटीआर -९ अंतर्गत दाखल करावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जीएसटी नेटवर्कने वार्षिक रिटर्नची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, पात्र मोठ्या करदात्यांपैकी ९१.३ टक्के करदात्यांनी १२ फेब्रुवारीपूर्वी जीएसटी रिटर्न्स (gst return) भरले आहे. तर ९२.३ पात्र करदात्यांनी १२ फेब्रुवारीपूर्वी सामंजस्य निवेदन दाखल केले.
२ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना वार्षिक जीएसटी रिटर्न्स (gst return) भरणे बंधनकारक आहे. अशा करदात्यांची संख्या देदेशातशात १२.४२ लाख आहे. नियमित कर भरणाऱ्या ९२.५८ लाख करदात्यांपैकी ही संख्या फक्त १३.४ टक्के आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांच्यासाठी वार्षिक रिटर्न भरणे अनिवार्य नाही (जीएसटीआर ९) त्यांनीही मोठ्या प्रमाणात रिटर्न भरले आहेत.
हेही वाचा -