केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष फेस्टिवल अॅडव्हान्स स्किम जाहीर केली आहे. या योजनेत सणांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अॅडव्हान्स मिळणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी या योजनेची घोषणा केली.
अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी वस्तूंना मागणी वाढणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनं महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली. कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष LTC कॅश स्किम योजना जाहीर केली आहे. या योजनेत केंद्रीय सरकारी कर्मचार्यांना एलटीएच्या बदल्यात कॅश व्हाउचर मिळणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांना हे व्हाउचर ३१ मार्च २०२०१ पूर्वी वापरणं बंधनकारक आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, राज्य सरकारचे कर्मचारी या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. त्यासाठी राज्य सरकारला या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागेल. या स्कीमसाठी कर्मचाऱ्यांना रुपे प्री-पेड कार्ड मिळेल. हे कार्ड रिचार्ज करावे लागले. त्यानंतर यात १० हजार रुपये जमा होतील. यासाठी लागणारे बॅंक शुल्क सरकार भरेल.
त्याचबरोबर राज्यांना ५० वर्षांपर्यंत १२ हजार कोटींचं बिनव्याजी कर्ज दिलं जाणार. अर्थसंकल्पातील खर्चाव्यतिरिक्त पायाभूत विकासावर २५ हजार कोटी अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबईसाठी मोठा निर्णय! मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार