Advertisement

6 वर्षांमध्ये केईएम रुग्णालयात 1176 नवजात बालकांचा मृत्यू

इतक्या मोठ्या प्रमाणात नवजात बालकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

6 वर्षांमध्ये केईएम रुग्णालयात 1176 नवजात बालकांचा मृत्यू
SHARES

केईएम रुग्णालयामध्ये (KEM hospital) 2019 पासून 2024 पर्यंत 1 हजार 176 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. केईएममध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नवजात बालकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, मुंबई (mumbai) महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करुन पुढील मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजले जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या (bmc) केईएम रुग्णालयामध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येत असतात. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र केईएम रुग्णालयामध्ये 2019 ते 2024 या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नवजात शिशु विभागामध्ये 1 हजार 176 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

2019 मध्ये 225 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. 2020 मध्ये 206, 2021 मध्ये 179, 2022 मध्ये 188, 2023 मध्ये 179 व 2024 मध्ये 199 अशा एकूण 1 हजार 176 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

नवजात बालकांचा मृत्यू होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये मातेचे वजन कमी असणे, प्रसूतीपूर्वी झालेला संसर्ग, प्रसूतीदरम्यान झालेली गुंतागुंत, बाळाला प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न होणे अशी महत्त्वाची कारणे असल्याचे प्रसूतीतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

मात्र केईएम रुग्णालयामध्ये सहा वर्षांमध्ये 1 हजार 176 बालकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचा मुद्दा आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी लेखी उत्तरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या (new born baby) मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.

तसेच नवजात बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजण्यात येत आहेत. तसेच, गरोदर महिलांच्या सर्वंकष आरोग्याच्या दृष्टीने योग्य समयी नाव नोंदणी करणे, त्यांना औषधोपचार व आहार पुरविणे, त्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे सांगितले.



हेही वाचा

महापालिका 'या' धोरणातून कोटींचे उत्पन्न मिळवणार

ठाणे - बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम ऑक्टोबरपासून सुरू होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा