Advertisement

१८ उड्डाणपूल अतिधोकादायक; तातडीनं दुरुस्तीची मागणी

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत अतिधोकादायक असलेल्या १८ उड्डाणपुल तसंच पादचारी पुलांची यादी झळकावून रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचं या पुलांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला. तसेच आतापर्यंत रेल्वे प्रशासनाला पादचारी पुल आणि उड्डाणपुलांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ११४ कोटी रुपये दिले. परंतु हा खर्च रेल्वेनं केला कुठे असा असा सवाल करत राजा यांनी याचा हिशोब दिला जावा, अशी मागणी केली.

१८ उड्डाणपूल अतिधोकादायक; तातडीनं दुरुस्तीची मागणी
SHARES

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील सर्व उड्डाणपुलांचं तसंच पादचारी पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलं. परंतु या ऑडीटनंतरही कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झालेली नसून मुंबईतील तब्बल १८ पूल अतिधोकादायक असल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली.  

रेल्वेला आतापर्यंत पुलांचं बांधकाम आणि दुरुस्ती करण्यासाठी तब्बल ११४ कोटी रुपये देऊनही त्यांच्याकडून कोणतंही काम केलं जात नाही, असा आरोप करत रवी राजा यांनी या सर्वांची दुरुस्ती त्वरीत हाती घेण्यात यावी अशी मागणी केली.


टिळक पुलाचं अायुष्य संपलं

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत अतिधोकादायक असलेल्या १८ उड्डाणपुल तसेच पादचारी पुलांची यादी झळकावून रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचं या पुलांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला. तसेच आतापर्यंत रेल्वे प्रशासनाला पादचारी पुल आणि उड्डाणपुलांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ११४ कोटी रुपये दिले. परंतु हा खर्च रेल्वेनं केला कुठे असा असा सवाल करत राजा यांनी याचा हिशोब दिला जावा, अशी मागणी केली. दादरचा टिळक पूल आणि एलफिन्स्टनचा पूल यांचं आयुष्य संपलं आहे. त्यामुळे भविष्यात गोखले पुलासारखी दुघर्टना घडण्याची वाट रेल्वे आणि महापालिका प्रशासन पाहतेय का असा संतप्त सवाल त्यांनी केला.


स्ट्रक्चरल ऑडीट सादर करा

शिवसेनेचे सदा परब यांनी राजा यांना पाठिंबा दिला. वाकोला येथील तानसा जलवाहिनीजवळ ४० वर्ष जुना पादचारी पुल आहे. परंतु हा पुल एमएमआरडीएच्या ताब्यात असून अजूनही तो कागदोपत्री अडकला अाहे. भविष्यात काही झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल परब यांनी केला. तर दादरचा टिळक पूल आणि एलफिन्स्टन पूल यांचं स्ट्रक्चरल ऑडीट होऊन त्याचा अहवाल आयुक्तांच्या टेबलावर पडला आहे. यामध्ये हे पूलं धोकादायक अवस्थेत असल्याचे आम्हाला समजलं. या पुलांचा अहवाल समितीला सादर केला जावा, अशी मागणी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केली.


स्ट्रक्चरल ऑडिटचा फार्स

गोखले उड्डाणपुलाच्या दुघर्टनेनंतर रेल्वेनं केवळ उड्डाणपूल व पादचारी पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट केलं. परंतु हा केवळ फार्सच असून कुणीही याची प्रत्यक्ष पाहणी केली नाही. केवळ डोळ्यांनी पाहून जे दिसलं त्यावरच हा अहवाल बनवल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यामुळे सदस्यांच्या मागणीचा विचार करता, रेल्वे हद्दीसहित मुंबईतील सर्व उड्डाणपुल आणि पादचारी पुलांचा जो स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल बनवला आहे, तो अहवाल समितीच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.



हेही वाचा -

पालिका आयुक्तांनी शिवसेनेपुढे टाकली नांगी; मागे घेण्याच्या पत्रानंतरही प्रस्ताव मंजूर

मेट्रोची धाव आता भाईंदरपर्यंत!


 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा