Advertisement

एम. एम. मिठाईवाला सह ज्वेलरी मार्केट, फिश मार्केटची बांधकामे भुईसपाट

मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडीची समस्या दूर झाली आहे.

एम. एम. मिठाईवाला सह ज्वेलरी मार्केट, फिश मार्केटची बांधकामे भुईसपाट
SHARES

मालाड रेल्वे स्थानक परिसरातील एम. एम. मिठाईवाला दुकानासह ज्वेलरी मार्केट, फिश मार्केट अशी १९ अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत.

पालिकेच्या पी उत्तर विभागाचे शुक्रवारी केलेल्या या कारवाईमुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडीची समस्या दूर झाली आहे.

मालाड स्थानकाबाहेरील आनंद मार्गावर अवैध फेरीवाले आणि दुकानांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते. या रस्त्यांवरून दररोज एक लाख २० हजार पादचाऱ्यांची ये-जा असते. अनधिकृत दुकानांमुळे पादचाऱ्यांना होणारी अडचण आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता, पालिकेने अनधिकृत दुकाने जमीनदोस्त केली. 

कारवाईत १५ पालिका अभियंता, चार पोकलेन मशिन, दोन जेसीबी, चार डंपरचा वापर करण्यात आला. पालिकेचे ४० कामगार व कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

पी/उत्तर विभागाने याठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रुंदीकरण रेषेमध्ये एकूण १९९ बांधकामे अडथळा ठरत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९ दुकानांवर कारवाई झाली. यामुळे रस्ता सुमारे १५ ते २० फूट रूंद करणे शक्य झाले आहे, अशी माहिती पालिकेने दिली.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा