मुंबईतील अंधेरी परिसरातील जुहू गल्लीतील मेहता बाबा चाळ येथील ३ मजली घर कोसळलं. घर कोसळून ५ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
या दुर्घघटनेत अकबर शेख (६०), चांद शेख (३४), आरीफ शेख (१७) आणि अजरा शेख (१८) हे जखमी झाले असून, त्यांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच, शमसुद्दीन शेख (५०) याची प्रकृती ठीक असल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेतली.
दरम्यान मुंबईत गेल्या काही दिवसांपासून घर कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
हेही वाचा