Advertisement

वारसा जपणारे 300 वर्ष जुने वांद्रेतील गाव

वांद्रेच्या मध्यभागी असलेले रणवार हे असेच एक गाव आहे.

वारसा जपणारे 300 वर्ष जुने वांद्रेतील गाव
SHARES

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (mumbai) शहराने गेल्या काही वर्षांमध्ये बराच विकास केला आहे. तरीही काही 'गावठाणांनी' (villages) त्यांचा वारसा जपला आहे. वांद्रेच्या (bandra) मध्यभागी असलेले रणवार (ranwar) हे असेच एक गाव आहे. 

वांद्रे झपाट्याने विकसित होत असताना बॉलीवूड कलाकारांचे तसेच उच्चभ्रूंचे घर बनले आणि रस्त्यावरील खरेदीचे केंद्रही बनले. मात्र रणवारच्या रहिवाशांनी त्यांचे जुने बंगले आणि जुना वारसा अजुनही सांभाळून ठेवला आहे. 

रणवारमधील अनेक घरांचा आता पुनर्विकास होत असला तरी, वेरोनिका स्ट्रीटने त्याचे जुने आकर्षण कायम ठेवले आहे. 1866 मध्ये तिथे एक चौक उभारण्यात आला होता. तसेच येथून मेहबूब स्टुडिओ अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वेरोनिका स्ट्रीटवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पुर्वी हेलन आणि झीनत अमान या कलाकारांना रणवरच्या आसपास अनेकदा वावरताना पाहिले आहे. 

"वांद्रे पश्चिमेचे सौंदर्य म्हणजे येथील जुनी 'गावठाणे' आहेत. आणि यांचा वारसा जतन करण्याची गरज आहे. मी सरकारला जिल्हा नियोजन विकास समितीकडून निधी देण्याची मागणी केली आहे. यामुळे रणवार गावाला नवीन रूप मिळेल. येथील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे, स्थानिक आणि वास्तुविशारदांच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यावरील दिवे, पार्किंग आणि ट्रॅफिक प्लॅन देखील तयार केले जातील," असे आशिष शेलार (ashish shelar) यांनी पीटीआयला सांगितले. 

आर्किटेक्ट समीर डी'मॉन्टे 2009 पासून रणवार वेरोनिका स्ट्रीट रेसिडेंट्स असोसिएशनमध्ये काम करत आहेत. डी'मॉन्टे म्हणाले की रस्ते, ड्रेनेज सिस्टम, रस्त्यावरील स्ट्रीट लाईट, पार्किंग व्यवस्थापन यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय, घरे रिडेव्हलप करण्यात आली आहेत आणि अग्निशमन यंत्रणा देखील सुरू करण्यात आली आहे.

खाकी टूर्सचे केवन उमरीगर, जे मुंबईच्या हेरिटेजबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे काम करतात, ते म्हणाले की वांद्र्यात 23 गावठाण आहेत. ज्यात मच्छीमार लोक, कुणबी आणि आगरी समुदाय राहतो. रणवार हे शेतीचे गाव होते आणि या परिसरात भातशेती होती. नंतर या भातशेती नागरी वसाहतीत रुपांतरीत झाली. या छोट्या गावांचे आता शहर झाले आहे. आता वांद्र्यात फक्त 10 ते 15 गावठाणच उरली आहेत. 



हेही वाचा

स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन मुंबई-गुजरात बुलेट ट्रेनच्या ट्रँकवर धावणार

ऑस्कर 2025 मध्ये 'लापता लेडीज'ची एंट्री

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा