एसी लोकलच्या तिकिटांचे दर पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. गुरुवारी ५ मे पासून सुधारित दर लागू करण्यात आले आणि याचा चांगलाच फायदा प्रवाशांनी घेतल्याचे दिसून येत आहे. दर कपातीनंतर प्रवाशांनी एसी लोकलला पसंती दिल्याचं दिसतं. परिणामी लोकलमधील प्रवासी संख्या वाढल्याचं दिसत आहे.
गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलच्या २ हजार ३०८ तिकिटांची विक्री झाली होती. तर पश्चिम रेल्वेवरही ३ हजार ५२ तिकिटे खरेदी करण्यात आली. हा प्रतिसाद इतर दिवसांच्या तुलनेत चांगला असल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वेने केला आहे.
WR ने उघड केलेल्या आकडेवारीनुसार, ४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, सुमारे २,३४९ AC सिंगल ट्रॅव्हल तिकिटे जारी करण्यात आली होती. दरम्यान, ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चर्चगेट ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ३,०५२ एसी तिकिटे काढण्यात आली होती. यासह, प्रवाशांच्या संख्येत ७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरात कपात केल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. येत्या काही दिवसांत प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चर्चगेट ते विरार दरम्यान एसी भाडे २२० वरून ११५ आणि चर्चगेट ते बोरिवली १८० वरून ९५ पर्यंत कमी करण्यात आले होते.
तिकिटांचे दर कमी केल्याने खूश झालेल्या प्रवाशांनी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. तसंच मासिक पासचे दर देखील शासनाने कमी करायला हवेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
मध्य, तसेच पश्चिम उपनगरीय रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा प्रवास गुरुवार, ५ मेपासून स्वस्त होत आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. शिवाय सामान्य लोकलच्या (विनावातानुकूलित लोकल) प्रथम श्रेणीचेही भाडेदर कमी करण्यात आले आहेत. मात्र वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीच्या पास दरात मात्र बदल करण्यात आलेला नाही.
वातानुकूलितच्या तिकीट दरात कपात केल्यानं चर्चगेट ते बोरिवलीचे सध्याचे तिकीट १८० रुपयांहून ९५ रुपये, तर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे भाडेदर १४० रुपयांवरून ८५ रुपये झाले आहे.
सीएसएमटी ते कल्याणपर्यंत वातानुकूलितचे तिकीट १०५ रुपये झाले आहे. पूर्वी हा दर २१० रुपये होता. या मार्गावरील प्रथम श्रेणीचे तिकीटही १६५ रुपयांऐवजी १०० रुपये आकारले जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा