सीएनजीच्या दरांमध्ये प्रतिकिलोमागे 1.5 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. पण याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होताना दिसून येत आहे. घरगुती पाईपलाईन गॅसची दरवाढही यावेळी जाहीर करण्यात आली. रिक्षा संघटनेनंही भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे.
आता टॅक्सी युनियनही दरवाढीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय येत्या काळात घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान केंद्रानं सीएनजी आणि पीएनजीमध्ये केलेल्या दरवाढीनंतर ऑटोरिक्षा चालकांनी प्राथमिक दर 23 रुपयांवरून 25 रुपयांवर करण्याची मागणी केली आहे. तर, प्रति किमी रनिंग भाडं 15.33 रुपयांवरून 16.99 रुपये केलं जाण्याची मागणीसुद्धा केली आहे.
चालक संघटनेच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीएनजीमध्ये करण्यात आलेल्या दरवाढीमुळे ऑटोचालकांना दर दिवशी 150 रुपयांचं नुकसान सोसावं लागत असल्याची बाब त्यांनी पुढे केली. इथं ऑटो चालकांनी ही मागणी केलेली असतानाच टॅक्सी चालक संघटनेकडूनही प्राथमिक भाडं 28 रुपयांवरून 30 रुपये करण्याची मागणी उचलून धरण्यात आली आहे.
दरम्यान यासंदर्भातील निर्णय सविस्तर चर्चांनंतरच होणार आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी युनियननं निर्णय घेतल्यानंतर सदरील निर्णयासंदर्भातील प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेली भाडेवाढ
MMRTA च्या वतीनं 2022 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली होती. इथं ऑटोरिक्षासाठी 2 रुपये आणि टॅक्सीभाड्यामध्ये 3 रुपये इतकी वाढ करण्यात आली होती. आता दोन वर्षांनंतर ही वाढ नेमकी किती फरकानं होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा