Advertisement

मालाडमध्ये हवेची पातळी खालावली

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगर प्रदेशातील भागात मध्यम AQI नोंदवले गेले.

मालाडमध्ये हवेची पातळी खालावली
प्रतिकात्मक छायाचित्र
SHARES

रविवारी, शहरात एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 141 नोंदवला गेला आहे. ज्यामध्ये 30 पैकी 24 स्थानकांचा समावेश आहे. 2.5 व्यासाचे (PM) कण हे शहरातील प्रदूषणाचे मुख्य कारण होते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील (MMR) भागातही मध्यम AQI नोंदवले गेले. त्यापैकी बहुतेक ठिकाणी PM10 इतकी प्रदूषणाची पातळी होती.

24 तासांच्या सरासरीमध्ये योगदान देणाऱ्या 24 स्थानकांपैकी, मालाडमध्ये (malad) 213 AQI ची नोंद झाली. मागच्या काही दिवसातील निर्देशांक पाहता मालाडमध्ये हवेची पातळी खालावली आहे. तसेच यातील बहुतेक स्थानकांमध्ये हवेची पातळी खराब श्रेणीत होती.

यातील तीन स्थानकांमध्ये हवेची पातळी समाधानकारक होती. उर्वरित स्थानकांमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असल्याचे दिसून आले.

एमपीसीबीने अलीकडेच एमएमआरमधील बेकरींना वाढत्या वायू प्रदूषणाचे कारण देत सहा महिन्यांत हरित ऊर्जा स्रोतांकडे म्हणजेच ग्रीन एनर्जी सोर्सकडे वळण्याची सूचना दिली होती.

सीपीसीबीच्या मते, 0 ते 50 दरम्यानचे AQI चांगले, 51 - 100 समाधानकारक, 101 - 200 मध्यम, 201 - 300 खराब, 301 - 400 खूप वाईट आणि 400 पेक्षा जास्त तीव्र मानले जाते.



हेही वाचा

पीओपी मूर्तींचे विसर्जन रखडल्याने मूर्तिकार संतप्त

सरकार 6 शहरांमध्ये डे केअर केमोथेरपी सेंटर्स उभारणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा