फळांच्या राजाचे बाजारात स्वागत झाले आहे. अनेकांच्या पसंतीचा आणि फळांचा राजा असलेला हापूस आंबा आता बाजारात दाखल झाला आहे. वाशीच्या (vashi) एपीएमसी (APMC) बाजारात सोमवारी कोकणातील हापूस आंब्याच्या (alphonso mango) 24 पेट्या दाखल झाल्या आहेत.
या पेट्यांची विधिवत पूजा करून हंगामाला सुरुवात करण्यात आली. यंदा हवामान बदलाने हापूस आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला होता.
हापूसला मोहोर फुटण्याची वेळ आणि हवामान बदल, परतीचा पाऊस तसेच कडाक्याची थंडी त्यामुळे मोहोर अतिप्रमाणात फुटला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी फळधारणा झाली नाही.
तसेच थ्रिप्स रोगामुळेदेखील हापूस आंब्यांचा मोहोर गळून गेला. यामुळे आंब्यांच्या बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
सोमवारी बाजारात कोकणातील (kokan) हापूसच्या 24 पेट्या दाखल झाल्या. दाखल झालेल्या हापूसची 4 ते 6 डझनाच्या एका पेटीची 10 हजार ते 15 हजार रुपये बाजारभावाने विक्री होत आहे.
दरम्यान, यावर्षी हापूसचे उत्पादन चांगले झाले असेल. हंगामाला एक महिना उशिराने सुरुवात होत असून 15 मार्च नंतर बाजारात हापूसची आवक वाढणार आहे, अशी माहिती एपीएमसी फळबाजारचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
हेही वाचा