पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला ब्रिजला धडकून बेस्टच्या डबल डेकर बसला गुरूवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात बसच्या टपाचा चक्काचूर झाला. सुदैवानं या बसमध्ये कुणीही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मरोळ आगारातून ४९३३ क्रमांकाची एक डबल डेकर बस दुपारी १.०५ वाजता कुर्ला आगाराकडे निघाली होती. ही बस पश्चिम द्रुतगती मार्गावरील सर्व्हिस रोडवरून जात असताना वाकोला ब्रिजला धडकली. या अपघातात बसच्या टपाचं मोठं नुकसान झालं आहे. ही बस फेरी बस नसल्याने या बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे या अपघातात कुणालाही दुखापत झालं नाही.
हा अपघात नेमका कसा घडला यामागचं कारण जाणून घेण्यासाठी बसचालक आनंद विभुते यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा-
लंडनच्या छोट्या राजपुत्राला डबेवाल्यांकडून भेट, पाठवणार वाळे आणि कमरपट्टा