बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे. दिवाळीपूर्वी २० टक्के दराने बोनस मिळण्यासाठी ऑगस्ट क्रांति मैदान ते आझाद मैदानापर्यंत बुधवारी संध्याकाळी ६ वाजता मेणबत्ती मोर्चा काढण्याचा इशारा या संघटनेनं दिला आहे.
एक महिन्यापूर्वी बेस्ट प्रशासनासह बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक, बेस्ट समितीचे अध्यक्ष यांच्याकडे बोनसच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं होतं. या निवेदनात २०१७-१८ सालासाठी २० टक्के दराने बोनस रक्कम दिवाळीपूर्वी देण्याची मागणी करण्यात आली होती.
बेस्ट उपक्रमाला तोटा झाल्यास मुंबई महापालिकेला बेस्ट उपक्रमाला मदत करण्याचा नियम आणि कायदा आहे. असं असूनही बेस्ट प्रशासन व मनपा आयुक्त यांनी कायदा आणि नियमांचा भंग करून गेल्यावर्षी दिलेली बोनसची रक्कम समान १० हप्त्यांमध्ये बेस्ट कामगारांच्या वेतनातून कापून घेण्यात आलं होतं. याविरोधात संघटनेने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा -