Advertisement

घाटकोपरमध्ये खड्डेदुरुस्ती पुन्हा सुरू


घाटकोपरमध्ये खड्डेदुरुस्ती पुन्हा सुरू
SHARES

घाटकोपर - या भागात खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खड्यांमुळे गोळीबार रोडची अक्षरश: चाळणी झाली होती. गुरुवारी १३ ऑक्टोबरला एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या भागापुरतीच खड्डेदुरुस्ती करून पालिकेने जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला खरा, पण काम अर्धवट केल्यामुळे रहिवासी चांगलेच संतापले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच उरलेल्या रस्त्यांवरचे खडे भरण्याचे काम पालिकेनं हाती घेतलं. पण यातही पालिका कामचलाऊपणा करत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. खड्ड्यांमधील जुनी खडी न काढताच नवीन खडी टाकून खड्डे बुजवले जातायत. त्यामुळे खडी दोन दिवसांत उखडून जाते असं दुकानदार सुरेश राई यांनी म्हटलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा