Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक पुढे ढकलणार?

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक पुढे ढकलणार?
SHARES

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळानं २२७ वरून २३६ पर्यंत नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे पालिका वायव्य ते आग्नेय मुंबईपर्यंत आपल्या प्रभागांची पुनर्रचना करण्याची तयारी करणार आहे. आतापर्यंत प्रभागांची पुनर्रचना करण्यास सुरुवात होणे आव्श्यक होतं. प्रभागांची पुनर्रचना फेब्रुवारीपर्यंत न झाल्यास निवडणुका एप्रिल किंवा मे मध्ये होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितलं की, नुकत्याच पार पडलेल्या परिसीमन मांडणीत प्रशासकिय संस्था नऊ प्रभाग जोडू शकत नाही. त्यांना त्याची उजळणी करावी लागेल.

राज्य निवडणूक आयोगाकडून (SEC) नवीन निर्देश मिळाल्यानंतर त्यांना नव्यानं मांडणी करावी लागणार आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं प्रभाग संख्या वाढवण्याचा अध्यादेश जारी केल्यानंतर हे शक्य होईल.

अध्यादेश आल्यानंतर ते महापालिकेला आवश्यक निर्देश देतील, असं एसईसीचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितलं.

सीमांकन सहसा दर दहा वर्षांनी केले जाते आणि BMC नं सुमारे ६० वॉर्डांच्या सीमा सुधारल्या आहेत आणि २०% बदलल्या आहेत.

तसंच मुंबई उपनगरातील सर्व नऊ नगरसेवक जोडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवार, २२ नोव्हेंबर रोजी, पालिकेनं कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २० महिन्यांच्या कालावधीनंतर पहिली ऑफलाऊन बैठक घेतली.



हेही वाचा

झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचा 'तो' प्रकल्प महापालिकेनं केला रद्द

वरळी कोस्टल रोड प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढू- भाई जगताप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा