Advertisement

वाढत्या वायू प्रदूषणामुळे पालिकेची कारवाई

स्थानिकांच्या सततच्या तक्रारीमुळे महापालिकेने जागेची तपासणी केली. या विशेष तपासणी पथकांना असे आढळून आले की साइट्स आवश्यक धूळ नियंत्रण नियमांचे पालन करीत नाहीत.

वाढत्या वायू प्रदूषणामुळे पालिकेची कारवाई
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) शनिवारी, 26 ऑक्टोबर रोजी रात्री वायू प्रदूषणाला (air pollution) आळा घालण्यासाठी कारवाई केली.

हवेच्या गुणवत्तेच्या (air quality) नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी अंधेरी पूर्वेकडील दोन बांधकाम साइट्सना काम थांबवण्याचे आदेश जारी केले.

या दोन साइट विलेपार्ले आणि अंधेरी (andheri) (जेबी नगर) येथील आहेत. स्थानिकांच्या सततच्या तक्रारीमुळे महापालिकेने जागेची तपासणी केली. या विशेष तपासणी पथकांना असे आढळून आले की, साइट्स (construction sites) आवश्यक धूळ नियंत्रण नियमांचे पालन करीत नाहीत.

जे.बी.नगरमधील साइटवर पाडकाम केलेला मलबा जवळच्याच चाळीजवळ पडला होता. तसेच विलेपार्लेतील साइटवर बांधकामामुळे जास्त प्रमाणात धूळ निर्माण झाली होती.

हे स्टॉप-वर्क ऑर्डर 25 ऑक्टोबर, 2023 रोजी सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या नवीन हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत येतात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार 70 मीटरपेक्षा उंच असलेल्या सर्व बांधकाम साइट्सना किमान 35 फूट उंच टिन किंवा धातूच्या शीटने वेढलेले असणे आवश्यक आहे.

पाडकाम होणारी ठिकाणे पूर्णपणे ताडपत्रीने झाकलेली असणे आवश्यक आहे. तसेच धूळ पातळी कमी ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करणे अनिवार्य आहे.

मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 354 अ अन्वये काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोटिसांमध्ये असेही नमूद केले आहे की, प्रदूषणाच्या नियमांचे सतत उल्लंघन केल्यामुळे सर्व उपकरणे, यंत्रसामग्री आणि साहित्य काढून टाकल्यास. त्यास बांधकाम विकासक स्वत: जबाबदार राहतील.



हेही वाचा

माहिममधून अर्ज भरण्यावर सदा सरवणकर ठाम

दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून संजय निरुपम विरूद्ध सुनील प्रभू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा