Advertisement

सांडपाणी प्रक्रियेसाठी महापालिकेतर्फे ७ प्रक्रिया केंद्राची उभारणी

सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सध्या महापालिका प्रयत्न करत आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पूनर्वापर करण्यासाठी महापालिकेतर्फे पुनर्प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

सांडपाणी प्रक्रियेसाठी महापालिकेतर्फे ७ प्रक्रिया केंद्राची उभारणी
SHARES

सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सध्या महापालिका प्रयत्न करत आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पूनर्वापर करण्यासाठी महापालिकेतर्फे पुनर्प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकूण ७ प्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहेत. या ७ प्रक्रियापैकी वर्सोवा व घाटकोपर या २ केंद्रांच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. तसंच, या कंपनीला प्रकल्प सल्ल्यासाठी ५५ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं समजतं.

नवीन प्रक्रिया केंद्र

सांडपाणी विल्हेवाटीसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाची दिवसेंदिवस कडक होणारी धोरणेवाढणारी लोकसंख्या या सर्व बाबी लक्षात घेऊन पालिकेनं २००२ मध्ये मलनि:सारण प्रकल्प-२ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहेया प्रकल्पाचा अभ्यास करून नवीन प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी संकल्पचित्रेबांधकाम व देखरेख या तत्त्वावर वरळीवांद्रेधारावीवर्सोवाभांडुपघाटकोपर व मालाड यांच्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सध्यस्थितीत घाटकोपर व वर्सोवा या सांडपाणी पुनप्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडण्यात येत आहे.

कामाचा दर्जा

नव्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी काम सुरू असताना तांत्रिक देखरेख करणं बंधनकारक आहे. त्यामुळं बांधकाम व प्रकल्प व्यवस्थापनासाठी या क्षेत्रातील कार्यरत असलेली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा नियुक्त करणं गरजेचं होतं. त्यामुळं या कामासाठी सल्लागाराची निवड करण्यासाठी महापालिकेनं निविदा मागवल्या होत्या.

Advertisement

सल्लागार नियुक्ती

त्यानुसार, टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांसाठी अनुक्रमे १९ कोटी ७ लाख रुपये व ३५ कोटी ३९ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे या सल्लागार नियुक्तीला काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे मंजुरी देण्यात आली होती.



हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा 'या' कामांना अडथळा नाही

विधानसभा निवडणुकीसाठी माधुरी दीक्षितचं मतदारांना आवाहन


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा