मुंबई महापालिकेमध्ये पेपरलेस कामकाज सुरू आहे. यामुळे संगणकाचा वापर अधिक केला जातो आहे. मुंबई महापालिकेनं ई-ऑफिस, ऑटोडीसीआर, एसएपी, बायोमेट्रिक हजेरी या संगणक प्रणालीचा अवलंब सुरू केला आहे. मात्र, सध्या वापरण्यात येणारे संगणक जुने असल्याने २ हजार ७६५ नवीन संगणक घेण्यात येणार आहेत. यासाठी २२.५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेनं ई-ऑफिस, ऑटोडीसीआर, एसएपी, बायोमेट्रिक हजेरी या संगणक प्रणालीचा अवलंब सुरू केला आहे. त्यामुळे विविध विभाग व पालिका कार्यालयांसाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर घेण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र, बरेच संगणक व उपकरणे ५ वर्षांपेक्षा जुने व कालबाह्य झाल्यामुळे विभागांच्या मागणीनुसार संगणक, प्रिंटर, स्कॅनरची खरेदी करण्यात येणार आहे.
यात २ हजार ७६५ संगणकांची खरेदी केली जाणार आहे. तसेच मिनी लेजर ए फोरसाइज प्रिंटर ५१०, मोनो इंक टँक ए फोर प्रिंटर २६५, मल्टीफंक्शन मोनो लेजर प्रिंटर ५०, एडीएफ डॉक्युमेंट स्कॅनर ३६० अशा उपकरणांचीही खरेदी केली जाईल.