Advertisement

राणीची बाग लवकरच सर्वांसाठी खुली होणार

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यान पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

राणीची बाग लवकरच सर्वांसाठी खुली होणार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं ११ महिन्यांपासून बंद असलेलं दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यान पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मार्चमध्ये लॉकाडाऊन लागू झाल्यानंतर राणीची बाग ही बंद ठेवण्यात आली होती. 

१५ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना जिजामाता उद्यानात प्रवेश द्यावा यासाठी संचालकांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडं प्रस्ताव पाठवण्यात आला असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लवकरच सर्व नियमांसह राणीची बाग खुली होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन आता सर्वच क्षेत्रात शिथिल झाल्यानं आता राणीची बागही खुली करावी यासाठी महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठीचा आराखडा यात देण्यात आला आहे. आता यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

उद्यानात पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून जागोजागी ठराविक अंतरावर वर्तुळ आखण्यात आले आहे. प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱ्यासमोर आणि तिकीट खिडकीजवळही असे गोल आखलेले आहेत. तसेच जागोजागी सॅनिटायर, कचराकुंडी आदींची सोय करण्यात आली आहे. मात्र, गर्दी वाढली तर त्यावेळे पुरते प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचं समजतं.

सामान कक्षही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं पर्यटकांनी सामान घेऊन येऊ नये. तसेच पक्ष्यांच्या पिंजऱ्यातील पर्यटकांसाठी असलेला छोटा पूलही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आत पिंजऱ्यात जाता येणार नाही, तर बाहेरूनच पक्षी पाहावे लागणार आहे.

राणी बागेत दररोज सुमारे ५-६ हजार तर शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी १० ते १५ हजारांपर्यंत पर्यटक येत असतात. लॉकडाऊनपूर्वी दर दिवशी १५ ते १६ हजार रुपये, तर शनिवार, रविवारी लाखांच्या घरात उत्पन्न मिळत होते. मात्र, गेल्या ११ महिन्यांपासून राणीबाग बंद असल्यानं आतापर्यंत ५ कोटीचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा