Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडण्याची शक्यता

अर्थ विधेयक २०२० मध्ये सरकारनं इंधनाच्या उत्पादन शुल्कात १८ रूपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचे अधिकार मिळवले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडण्याची शक्यता
SHARES

कोरोना व्हायरसमुंळं हैराण झालेल्या नागरिकांना आता आणखी एका त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. कारण आता इंधनाच्या उत्पादन शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थ विधेयक २०२० मध्ये सरकारनं इंधनाच्या उत्पादन शुल्कात १८ रूपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचे अधिकार मिळवले आहेत. त्यामुळं पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यादरम्यान कच्च्या तेलाचं दरयुद्ध सुरू आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. या परिस्थितीत सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नव्या विधेयकानुसार सरकारला पेट्रोलवर १८ रूपये तर डिझेलवर १२ रूपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचा अधिकार मिळाला आहे. 

यापूर्वी इंधनावर उत्पादन शुल्क लावण्याची मर्यादा कमी असून, सरकारकडं पेट्रोवर १० रूपये तर डिझेलवर ४ रूपये इतकं उत्पादन शुल्क लावण्याचे अधिकार होते. आता सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर अधिक ८ रूपयांचे उत्पादन शुल्क आकारण्याचा अधिकार मिळवला आहे. 

केंद्र सरकारला महसूलात वाढ करण्यासाठी याचा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, याच महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर ३ रूपयांचं उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी सरकारला २ हजार कोटी रूपयांचा महसूल मिळाला होता.

गेल्या ६ दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये कोणतेही बदल पाहायला मिळाले नव्हते. परंतु आता इंधानाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सामन्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा -

१०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरीच तपासणार

Corona Virus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा