दरवर्षी अनेक लहान मुलं रेल्वे स्थानकात आढळतात. मुंबईतील विविध स्थळांचं आकर्षण, ग्लॅमरस दुनिया, सेलीब्रिटींना भेटण्याच्या इच्छेखातर, पालकांना कंटाळून, मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी लहान मुलं मुंबईमध्ये येत असतात. त्यानंतर मुंबईतील गर्दीमध्ये ही लहान मुले हरवतात. अशा एकूण २८५ मुलांची घरवापसी मध्य रेल्वे प्रशासनानं जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये केली आहे.
रेल्वे परिसरात हरविलेल्या किंवा पळून आलेल्या २८५ मुलांना विश्वासात घेऊन त्यांना मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या वतीनं या मुलांना शोधण्यात येतं. त्यानंतर त्या मुलांची समजूत काढून त्यांची घरवापसी केली जाते.
जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये सापडलेल्या २८५ मुलांची विचारपूस करून त्यांची घरवापसी किंवा सामाजिक संस्थांमध्ये रवानगी रेल्वे सुरक्षा बलाने केली आहे. याआधी २०१८ साली मुंबईत हरविलेल्या ४७७ मुलांची घरवापसी मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागानं केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली.
हेही वाचा -
यूजीसी ठेवणार विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती
मध्य रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेस होणार ‘उत्कृष्ट’