मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे २५८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गुरूवारी दिवसभरात १३९० नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः- Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चेकपोस्ट तयार, दीड लाख लोकं येण्याची शक्यता
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जुलै रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १२ जुलै रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे १३९० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ९६ हजार २५३ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ११९७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६७ हजार ८३० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाः- भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १० वर
राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४,भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भाईंदर मनपा- ५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७,सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४,हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३,अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.