Advertisement

राज्यात कोरोनाचे ६ हजार ४०६ नवे रुग्ण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०५,४७,३३३ चाचण्यांपैकी १८,०२,३६५ (१७.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात कोरोनाचे ६ हजार ४०६ नवे रुग्ण
SHARES

आज राज्यात ६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण ६ हजार ४०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीनुसार करोना मृतांचे प्रमाणही घटल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात करोना रुग्णसंख्या आता कमी होऊ लागली आहे. दिवाळीच्या तोंडावर रुग्णसंख्या व मृतांचे प्रमाण अटोक्यात येत असल्यानं हा मोठा शुभसंकेत असल्याचं बोललं जातं आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दैनंदिन सरासरी करोनामृतांची संख्य १०० च्या घरात पोहोचत होती. आता हीच संख्या अटोक्यात येत आहे. तर, आज ही फक्त ६५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजची ही आकडेवारी पाहता आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे प्रयत्नांना यश येत असल्याचं समोर दिसत आहे.


कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट येत आहे. तर,राज्यातील रुग्ण बरो होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांजवळ येऊन पोहोचले आहेत. आज ४,८१५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६, ६८,५३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात ५,२८,६९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात एकूण ६४०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं करोना रुग्णांची संख्या १८ लाख ०२ हजार ३६५ इतकी झाली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०५,४७,३३३ चाचण्यांपैकी १८,०२,३६५ (१७.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा