Advertisement

म्हणून सोनू सूदला पोलिसांनी रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला नाही

अभिनेता सोनू सूदला वांद्रे टर्मिनल येथे पोलिसांनी रेल्वे फलाटावर प्रवेश नाकारण्यात आला. त्यावरून सोशल मिडियावर उलटसूलट चर्चां सुरू होत्या.

म्हणून सोनू सूदला पोलिसांनी रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला नाही
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रातील स्थलांतरीत मजुरांसाठी मसिहा ठरलेल्या अभिनेता सोनू सूदला वांद्रे टर्मिनल येथे पोलिसांनी रेल्वे फलाटावर प्रवेश नाकारण्यात आला. त्यावरून सोशल मिडियावर उलटसूलट चर्चां सुरू झाल्या, मात्र कोरोनाच्या पाश्वभूमिवर सोशल डिस्टंसिंग ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळेच रेल्वे फलाटांवर रेल्वे पॅसेंजर आणि कर्मचारी वगळत इतरांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत अभिनेता सोनू सूद यांना माहिती दिल्यानंतर त्यांनीही सहकार्य केल्याचे रेल्वेचे सीपीआरओ रविंद्र भाकर यांनी सांगितले.

हेही वाचा:- 'त्या घोटाळेबाजाची संपत्ती पहिल्यांदा ताब्यात घ्या...' न्यायालयाचे आदेश

राज्यात लाँकडाऊनला सुरूवात झाल्यानंतर परप्रांतियांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले. अशातच अभिनेता सोनू सूद हा मदतीसाठी पुढे आला. सुरूवातीला त्याने खासगी बसच्या मदतीने काही अडकलेल्या मजुरांना गावी पाठवले. ते पाहून अनेक मजूरांनी सोशल मिडियावर सोनूकडे मदत मागितली. अडकलेल्या नागरिकांच्या व्यथा लक्षात घेऊन सोनूने पुढे त्याचे मदत कार्य सुरूच ठेवले. पाहता पाहता मजुरांनी सोनूला डोक्यावर घेतले. सोशल मिडियावर ही सोनूच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले. आतापर्यंत सोनूने हजारो मजूरांना बसने तर काहींना रेल्वेने त्यांच्या गावी जाण्यात मदत केली. तर काहींनी सोनूच्या या मदतकार्यावर प्रश्न ही उपस्थित केले.

हेही वाचा:- ४८ तासात ६६ पोलिसांची कोरोनावर मात

दरम्यान सोमवारी देखील वांद्रे टर्मिनलहून श्रमिकांसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेनमधील मजुरांच्या भेटीसाठी आला होता. मात्र त्यावेळी रेल्वे पोलिसांनी सोनूला फलाटावर जाण्याची परवानगी दिली नाही. फलाटावर जाऊन मजुरांची भेट घेता यावी, यासाठी सोनूने रेल्वे अधिकाऱ्यांककडे परवानगी मागितली. परवानगी मिळवण्यासाठी सोनू ४५ मिनिट रेल्वे पोलिसांकडे विनंती करत होता. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमिवर रेल्वे फलाटांवर रेल्वे पॅसेंजर आणि कर्मचारी वगळत इतरांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत अभिनेता सोनू सूद यांना रेल्वे पोलिसांनी माहिती दिल्यानंतर नियमानुसार तशी परवानगी देता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोनूला मजुरांची भेट न घेताच, माघारी फिरावे लागले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा