Advertisement

मुंबईत गेल्या २४ तासात १२० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

एकूण ६४३ पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासात १२० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईत गेल्या २४ तासात तब्बल १२० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर एका पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत १२६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण ६४३ पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात गेल्या २४ तासांत ३३ हजार ४७० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिलासादायक म्हणजे २९,६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा ६९ लाख ५३ हजार ५१४ इतका झाला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के इतके आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. देशात गेल्या २४ तासात १.६७ लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिलादायक म्हणजे ६९ हजार ७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली आहे.

तर गेल्या २४ तासात २७७ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या देशातील विविध भागात ८ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही एक चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण अकरा दिवसांपूर्वी हा आकडा फक्त एक लाख होता.



हेही वाचा

कोविडमुळे मुंबई उच्च न्यायालयानं कामाचे तास कमी केले

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा