मध्य रेल्वेने (central railway) प्रवाशांच्या (passangers) सोईसाठी कायमस्वरूपी 3 अतिरिक्त डब्यांसह ट्रेन (train) क्रमांक 22107/22108 आणि 22143/22144 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 2 अतिरिक्त 3 टायर एसी कोच (3 tier coach) आणि 1 अतिरिक्त 2 टायर एसी कोच (2 tier coach) असतील.
रेल्वे सेवांचे तपशील खाली दिले आहेत:
1) ट्रेन क्रमांक 22107/22108 CSMT मुंबई-लातूर एक्सप्रेस
01.12.2024 ला CSMT मुंबईहून सुटेल तसेच लातूर येथून 02.12.2024 ला सुटेल
2) ट्रेन क्रमांक 22143/22144 सीएसएमटी मुंबई-बिदर एक्सप्रेस
04.12.2024 ला CSMT मुंबईहून सुटेल तसेच 05.12.2024 ला बिदरहून सुटेल
ट्रेन क्रमांक 22107/22108 आणि 22143/22144 साठी सुधारित डब्ब्यांची रचना:
1 फर्स्ट एसी (AC coach), 2 एसी- II टियर, 4 एसी- III टियर, 8 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लाससह 2 लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन. (एकूण 21 कोच).
रेल्वे अधिकाऱ्यांनी वरील गाड्यांमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांची तिकिटं तपासावी ही विनंती केली आहे.
हेही वाचा