मस्जिद बंदर - मस्जिद बंदर येथील जंजिकर स्ट्रीटवरील रोडवर गटराच्या बाजुलाच एक मोठा खड्डा झाला आहे. त्यामुळे वाहन चालवणाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा विभाग जास्त रहद्दारीचा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. म्हणून हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा ही मागणी येथील दुकाणदार आणि रहिवाशी करत आहेत.