Advertisement

चेंबूरमध्ये सिलिंडर ब्लास्ट, दोन तरुणी जखमी

दोघींनी मदतीसाठी आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीसाठी गेले. तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले.

चेंबूरमध्ये सिलिंडर ब्लास्ट, दोन तरुणी जखमी
SHARES

मुंबईच्या चेंबूर परिस्थित गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत दोन तरुणी गंभीर रित्या भाजल्याची घटना  चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. सौम्या सिंग (२२), चंद्रा तारा सिंग (२५) अशी या दोघींची नावे आहेत. या दोघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचाः- वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली

चेंबूरच्या तानसा पाईप लाईनजवळ, माऊंट मेरी सोसायटीत मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या दोघी घरी असताना. अचानक गॅस गळती झाली. गॅस हा विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने अचानक आग लागली.क्षणार्धात भडका उडाल्याने या दोघी त्या आगीत सापडल्या, दोघींनी मदतीसाठी आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीसाठी गेले. तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीत सौम्या १५ ते २० टक्के,तर चंद्रा ४० ते ५० टक्के भाजली आहे. या दोघींना तातडीने उपचारासाठी जवळील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची नोंद पोलिसांनी करण्यात आली असून दोघींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.  


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा