Advertisement

दादरच्या प्रसिद्ध 'मामा काणे' हॉटेलच्या मालकाचं निधन

मुंबईतल्या दादर पश्चिम स्थानकाबाहेरी प्रसिद्ध 'मामा काणे' हॉटेलचे मालक बापूसाहेब काणे यांच निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. बापूसाहेब काणे यांचे शनिवारी धन्वंतरी रुग्णालयात निधन झाले.

दादरच्या प्रसिद्ध 'मामा काणे' हॉटेलच्या मालकाचं निधन
SHARES

मुंबईतल्या दादर पश्चिम स्थानकाबाहेरी प्रसिद्ध 'मामा काणे' हॉटेलचे मालक बापूसाहेब काणे यांच निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. बापूसाहेब काणे यांचे शनिवारी धन्वंतरी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मागील दीड महिना ते रक्तदाब आणि हृदयरोगानं आजारी होते.

इंजिनीअरिंगची पदवी

कमलाकर काणे असं त्यांचं मूळ नाव अाहे. मात्र, त्यांना बापूसाहेब काणे या नावानं ओळखलं जात होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, २ भाऊ, २ मुलं, सुना, नातवंडं असा परिवार आहे. बापूसाहेब काणे यांनी स्वीडनमधून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी १७ वर्षे टीआयएफआरमध्ये नोकरी केली. दोन वर्षे ते बीएआरसीमध्येही होते. त्यानंतर त्यांनी स्वतःची आयटी कंपनीही काढली होती.

१९१०मध्ये स्थापना

'मामा काणे' या हॉटेलची स्थापना बापूसाहेब काणे यांच्या वडिलांनी १९१० मध्ये केली होती. तेव्हापासूनच या हॉटेलला  मुंबईकरांची पसंती मिळत होती. २० व्या शतकात  मुंबईकरांसह अनेक जणांनी पसंती दिली होती. मात्र, काही काळानंतर बापूसाहेब काणे यांनी त्यांची कंपनी सन १९९५ मध्ये बंद केली आणि वडिलांनी १९१० मध्ये सरू केलेल्या हॉटेलच्या कामामध्ये लक्ष घातलं.



हेही वाचा -

अर्थसंकल्पानंतर घसरण सुरूच, सेन्सेक्स ६६५ अंकांनी कोसळला

प्रवाशांना दिलासा! एसटी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा