Advertisement

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अतिरिक्त धावपट्टीची मागणी

खासदार रविंंद्र वायकर यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अतिरिक्त धावपट्टीची मागणी
SHARES

मुंबईतील (mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (csmia) आणखीन एक धावपट्टी निर्माण करायची मागणी केली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विमानतळांवरील उड्डाणांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

विमानांच्या वाढत्या उड्डाणांमुळे सध्याची धावपट्टी अपुरी पडत आहे. यामुळे एअर ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी विमानतळाजवळील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी अतिरिक्त धावपट्टी बांधणे आवश्यक आहे, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली आहे.

यासंदर्भात रवींद्र वायकर (Ravindra waikar) यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरप्पू नायडू यांना पत्र पाठवले आहे. तसेच विमानतळाच्या आजूबाजूच्या इमारतींचा पुनर्विकास करताना फनेल झोनचा नियम पाळावा लागणार आहे.

या भागातील इमारतींच्या उंचीवर निर्बंध आहेत. विमानतळाच्या (mumbai airport) आजूबाजूच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास फनेल झोन नियमांमुळे अनेक वर्षांपासून रखडला आहे, अशी मागणीही वायकर यांनी पत्रात केली आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी या विषयाशी संबंधित सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची संयुक्त बैठक आयोजित करावी. या बैठकीत वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात यावीत.

तसेच येथील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना त्यांना चांगली घरे, पाणी व इतर मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे, असेही रविंद्र वायकर यांनी सुचवले आहे.



हेही वाचा

ठाण्यातील 'या' भागांमध्ये रविवारपर्यंत पाणीकपात

साठ्ये महाविद्यालयात रंगणार 'माध्यम महोत्सव'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा