दक्षिण मुंबईत मंत्रालय, विधानभवन या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावर मात करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेवरील विधानभवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. या भुयारी मार्गाचे 25 टक्के काम पूर्ण झाले असून जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करत आहे. या मार्गामुळे मेट्रो 3 मार्गिकेच्या विधानभवन स्थानकाची मंत्रालयाबरोबरच विधानभवनाच्या नवीन प्रशासकीय इमारती थेट जोडल्या जाणार आहे. न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने काम सबवे चे काम सुरू आहे.
मेट्रो ३ मार्गिकेचा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा जूनपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे या भुयारी मार्गेचेही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्याबरोबर सुरू करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.
दरम्यान, या सबवेचे काम डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाले होते. त्यावेळच्या नियोजनानुसार ते डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मंत्रालय आणि विधानभवन यांच्यासारख्या संवेदनशील क्षेत्राजवळ हे काम चालले असल्याने सुरक्षा परवानगीमुळे काम काहीसे संथपणे सुरू सुरू होते.
आता या कामांना गती देण्यात आली आहे. न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने सब-वेचे भुयारीकरण सुरू केले आहे. तसेच दुसऱ्या पाइलचे काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.
हेही वाचा