मुंबईत रोज हजारो मेट्रिक टन कचरा (Garbage) जमा होतो. या कचऱ्यातून सुका कचरा (dry wast) वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुलाबा (Colaba ) येथे सुका कचरा विलगीकरण (Dry waste separation) केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुका कचरा विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडवरील (dumping ground) कचऱ्याचा भार कमी व्हावा म्हणून मुंबई महापालिकेने मोठ्या सोसायटय़ांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणं बंधनकारक केलं आहे. मात्र, बहुतांशी सोसायट्यांनी या नियमाचं पालन केलेलं नाही. यामुळे पालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुका कचरा विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. असे कचरा विलगीकरण केंद्र उभारण्यासाठी पालिकेने निविदाही मागवल्या. -यामध्ये शहरातील विलगीकरण केंद्रासाठी एक निविदा आली. कुलाबा (Colaba ) येथे सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केंद्र होणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
कुलाबा (Colaba ) प्रमाणे पालिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुका कचरा विलगीकरण (Dry waste separation) केंद्र उभारण्यासाठी पालिका पुन्हा निविदा मागवणार आहे. हे केंद्र उभारण्यास इच्छुक असलेल्या संस्थेला प्रतिदिन किमान ५० मेट्रीक टन क्षमतेचा सुका कचरा प्रक्रिया यंत्रसंच स्थापित करावे लागणार आहे. तसेच भविष्यात त्याची क्षमता प्रतिदिन २५० मेट्रीक टनापर्यंत वाढवता येऊ शकेल, अशी अट घालण्यात आली आहे. घरोघरी जाऊन कचऱ्याचं संकलन करणे, त्याची वाहतूक करण्याची जबाबदारीही संस्थेवरच सोपविण्यात येणार आहे. देवनार, घाटकोपर, वांद्रे, मालाड येथील भूखंडाची सुका कचरा विलगीकरण केंद्रासाठी निवड करण्यात येणार आहे.
हेही वाचा -