Advertisement

कुलाबातील उद्यानाला लाडकी बहिण नाव देण्याची मागणी

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकाने ही मागणी केली आहे.

कुलाबातील उद्यानाला लाडकी बहिण नाव देण्याची मागणी
SHARES

दक्षिण मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक, मकरंद नार्वेकर यांनी रविवारी कुलाब्यातील दीपक जोग चौकातील उद्यान ‘फक्त महिलांसाठी’ जागा म्हणून आरक्षित करण्याची मागणी केली. भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात नार्वेकर यांनी आरक्षित उद्यानाला ‘माझी लाडकी बहिन उद्यान’ असे नाव देण्याची मागणी देखील केली आहे.

गुरुवारी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून नार्वेकर म्हणाले की, महिलांच्या चांगले आरोग्य प्रदान करण्यासाठी या मोकळ्या जागा पावरात आणण्याची गरज आहे. 

“अनेक महिलांना स्वावलंबी बनवलेल्या योजनेचे नाव या उद्यानाला दिले पाहिजे. त्यामुळे मी या उद्यानाला  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना हे नाव देण्याची मागणी करतोय. 

नार्वेकर यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये कुलाबा बागेची जागा 'केवळ महिलांसाठी' असावी अशी मागणी करणारे पत्र लिहले होते. आतापर्यंत त्यांनी चार वेळा अशा प्रकारचे पत्र पालिकाला लिहले आहे. 

लोकल ट्रेनमधील महिलांसाठी राखीव कोच आणि बेस्ट बसमध्ये महिलांसाठी राखीव जागांचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. पत्रात म्हटले आहे की, शहरात महिलांसाठी खुल्या जागा (बाग/उद्याने) नाहीत. “देशातील सर्वात सु रक्षित शहर असा लौकिक असलेल्या मुंबई शहरात महिलांसाठी एक समर्पित जागा आवश्यक आहे,” असे पत्रात नमुद केले आहे.



हेही वाचा

अखेर 29 गावं वसई-विरार महापालिकेत समाविष्ट

निवडणुकीच्या ड्युटीवर गेले पण अद्याप कामावर रुजू झालेच नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा