बाजूच्या शेतकऱ्याने एजंटच्या साहाय्याने सरकारशी डील केल्यानं त्यांना कोट्यवधींचा मोबदला मिळाला. मात्र आमच्यावर अन्याय झाला, असं सांगत धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सरकारचं १५ लाखांचं अनुदान नाकारलं.
संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ८० वर्षांच्या नरेंद्र पाटील यांना १५ लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती.
नरेंद्र पाटील मोबदला वाढवून देण्याच्या मागणीवर ठाम असल्याने त्यांनी हे अनुदान नाकारलं. ५ एकर शेती, त्यावर ५०० हून अधिक आंब्याची झाडे, विहीर हे सारं भूमी अधिग्रहणात गेलं. त्यामुळे कायद्यानुसार जमिनीचा योग्य मोबदला सरकारने द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. बाजूच्या शेतकऱ्याला दोन ते अडीच एकराच्या जमिनीसाठी मोबदला मिळतो मग त्याच न्यायानुसार आम्हालाही मोबदला मिळावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली होती.
हेही वाचा -