मुंबईतील आगीचं सत्र अजूनही थांबलेलं नाहीय. नरिमन पॉइंट येथील प्रसिद्ध हॉटेल ट्रायडंट आणि माझगावमधील बिर्याणीसाठी प्रसिद्द असलेल्या अफजल हॉटेलमध्ये बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दालाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.
नरिमन पॉइंट परिसरातील हॉटेल ट्रायडंटच्या बेसमेटमध्ये बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास आगी लागली. आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीचं मूळ कारण अद्याप समजलेलं नाही.
माझगाव येथील केप्सा बिर्याणीसाठी प्रसिद्द असलेल्या अफजल हॉटेलमध्ये बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास आग लागली. हॉटेलच्या स्वयंपाकगृहामध्ये ही आग लागली होती. काही वेळानंतर आगीची तीव्रता वाढून आग हॉटेलच्या वरच्या मजल्यावर पोहोचली. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
या आगीवर नियंत्रण मिळवताना हॉटेलला असलेल्या काचेच्या खिडक्यांमुळे अडथळा येत होता. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. परंतु हॉटेलचं चांगलंच नुकसान झालं आहे.
हेही वाचा-
अंधेरीतील कामगार रूग्णालयात पुन्हा आग
कामगार रुग्णालय आग : डिलिव्हरी बॉयनं वाचवले १० जणांचे प्राण