मुंबईतल्या चर्चगेट येथील बॅंक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही.
बुधवारी रात्री ही आगली मात्र याबाबत कोणालाच माहिती नव्हती. गुरूवारी सकाळी घटनास्थळी बॅंकेचे कर्मचारी आले असता त्यांनी काच तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आग लागल्याची माहिती मिळताचं घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
रात्रीच्या वेळी बॅंकेत कर्मचारी नसल्यामुळं कोणतीही जिवितहानी झालेली नाही. परंतु, अनेक वस्तू या आगीत जळून खाक झाल्या आहेत. आगीच कारण अद्याप समजलेलं नसून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
विधानभवनातील कँटिनच्या जेवणातील मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे
मुंबईत अवैध पार्किंग केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड