Advertisement

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

आमदार रईस शेख यांनी तिचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचे सांगत जबाबदार व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
SHARES

भिवंडीच्या (bhiwandi) न्यू आझाद नगरमध्ये एका चार वर्षाच्या मुलीसह 40 जणांवर भटक्या कुत्र्याने (street dog) हल्ला (attack)केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीड महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर सोमवारी सायन रुग्णालयात लैबा शेख या मुलीचा मृत्यू झाला. लैबा ही आई-वडिलांसोबत शांतीनगर परिसरात राहत होती. 

आमदार रईस शेख यांनी तिचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचा आरोप केला आहे. यासाठी जबाबदार व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

लैबाच्या आजोबांनी सांगितले की, कुत्र्याने तिचा चेहरा चावल्यानंतर (dog bite) तिला आयजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे तिला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे दाखल करण्यात आले.

पाच दिवसाच्या शस्त्रक्रियेनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. पण नंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला.


हेही वाचा

आशा वर्कर्ससाठी विमा योजना सुरू

महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटाचा मुंबईतील 22 जागांवर दावा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा