गोरेगाव - पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गोरेगावच्या लक्षधाम शाळेतील विद्यार्थी आणि टाटा पॉवर या विद्युत कंपनीच्या क्लब एनर्जी यांच्या वतीने आरे कॉलनीमध्ये वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेत लक्षधाम शाळेतील २५० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या वेळी १५० प्रकारची विविध रोपं लावण्यात आली. 'पर्यावरण समतोल राखण्यासाठीच वृक्षारोपण महत्त्वाची भूमिका बजावते' त्यानुसार 'पर्यावरण सांभाळण्याच्या हेतूनं आरे कॉलनीत अशोक, ताम्हण, आवळा अशी विविध झाडं लावण्यात आल्याचं' टाटा पॉवरचे मुख्य अधिकारी अशोक सेठी यांनी सांगितलं.