परळ - भोईवाडा येथील नवभारत विद्यालयात एका नवरदेवाने चक्क लग्नाच्या दिवशीच मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. वॉर्ड क्रमांक 202 मध्ये राहणारे महेश नवले यांचा 21 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता लग्नाचा मुहूर्त आहे. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत मतदान केले. मतदान केल्यानंतरच लग्न करणार असा निश्चय त्यांनी केला होता. मुंबईकरांनी देखील मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.