Advertisement

सायन उड्डाणपूलीची दुरूस्ती बाकी, प्रवाशांची गैससोय

मुंबईतून नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या व नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

सायन उड्डाणपूलीची दुरूस्ती बाकी, प्रवाशांची गैससोय
SHARES

मुंबईतून नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या व नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईतील महत्वाचा असणाऱ्या सायन उड्डाण पुलाच्या दुरूस्तीचं काम अद्याप झालेलं नाही. त्यामुळं सायन ते चेंबूर या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीची परिस्थीती निर्माण झाली आहे. वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्यानं प्रवाशांना लेट मार्क लागणार असून, मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.

सायन उड्डाणपुलाचं बेअरिंग बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Roads Development Corporation) १४ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या दुरुस्तीच्या कामात तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात येत आहे.

निश्चित वेळापत्रकानुसार हा पूल सोमवारी सकाळी ६ वाजता सुरू करण्यात येणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळं ब्लॉक लांबविण्यात येणार आहे. तसंच, हा उड्डाणपूल सोमवारी सुरू न होता, मंगळवारी सुरू होणार आहे. मंगळवारी सकाळी वाहतुकीस सुरू होणार आहे.

सोमवारी सकाळी ठरल्यानुसार सायन उड्डाणपूल सुरू न झाल्यामुळं आठवड्याचा पहिलाच दिवस वाहतूक कोंडीचा ठरणार आहे.



हेही वाचा -


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा