प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतल्या रस्त्यांच्या या दुरवस्थेविषयी चर्चा होते. या पावसाळ्यातही चित्र काही बदललेले नाही. महापालिकेने मात्र शहरात केवळ 39 खड्डेच शिल्लक असल्याचा दावा केला आहे. मुंबर्इतील रस्त्यांची जागोजागी चाळण झालेली दिसत असतानाही पालिकेने केलेल्या या दाव्याबाबत सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकट्या पश्चिम द्रुतगती मार्गावर 300 ते 400 खड्डे सापडतील असा दावा मनसेचे पालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसह संबंधित अधिका-यांवर कारवाईचीही मागणी त्यांनी केली.