मुंबई महापालिका क्षेत्रात ३२ मोफत वाहनतळ (पार्किंग) असून या वाहनतळांवर अनधिकृतपणे शुल्क आकारण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या वाहनतळांवर अनधिकृतपण शुल्क वसुली करणाऱ्यांवर मुंबई पोलिस कारवाई करणार आहे. त्याशिवाय या सर्व वाहनतळांच्या नियमित तपासणीसाठी ३ विशेष पथकही कार्यरत करण्यात येणार आहेत.
महापालिका क्षेत्रातील विविध मार्गांवर ३२ ठिकाणी वाहनचालकांना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु या वाहनतळांपैकी 'ए' विभागातील फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई समाचार मार्ग, महाकवी भूषण मार्ग तसंच 'सी' विभागातील नेताजी सुभाष मार्गावरील (मरीन ड्राईव्ह) पोलिस जिमखाना ते हिंदू जिमखाना जवळील वाहनतळावर अनधिकृतपणे शुल्क वसुली होत असल्याचं समोर आलं. त्यानुसार या ४ वाहनतळांसर्दभात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सोबत या मोफत वाहनतळांवर अनधिकृतपणे शुल्क वसुली होत नसल्याची खातरजमा करण्यासाठी ३ विशेष पथकही महापालिकेमार्फत कार्यरत करण्यात येणार आहे. या पथकांद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणी दरम्यान अनधिकृत शुल्क वसुली आढळून आल्यास किंवा वाहनतळ अनधिकृत आढळल्यास त्यासंबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी महापालिकेच्या रस्ते व वाहतूक खात्याला तसंच सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
येत्या काही दिवसांत संबंधित ठिकाणी 'मोफत वाहनतळ' असा उल्लेख असणारे ३ ते ४ फलक एका वाहनतळावर लावण्यात या,वे असेही आदेशही देण्यात आले आहे.
हेही वाचा-
खूशखबर! मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ
प्लास्टिकबंदी यशस्वी करण्यासाठी नगरसेवक जाणार सिक्कीमला