राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण केले आहे. परतीच्या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. ठाण्यासह रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्रतवण्यात आली आहे.
मुंबईत जोरदार पाउस सुरू आहे. त्याचा परिणाम सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. चिंचपोकळी परिसरातील लालबागच्या ब्रिजखाली पाणी साचले आहे त्याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसतोय. तर शिवडीतही अनेक परिसर जलमय झालेले आहेत.