Advertisement

कांदिवलीत विजेचा शॉक लागून २ चिमुकल्यांचा मृत्यू

कांदिवली परिसरातील पोईसर या भागात राहणाऱ्या २ चिमुकल्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

कांदिवलीत विजेचा शॉक लागून २ चिमुकल्यांचा मृत्यू
SHARES

मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत सोमवारी पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळी अनेक मुंबईकरांना पावसात भिजण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, याच पावसात भिजणं २ चिमुकल्यांना महागात पडलं. कांदिवली परिसरातील पोईसर या भागात राहणाऱ्या २ चिमुकल्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

पावसाचं पाणी तुंबलं

तुषार झा आणि ऋषभ तिवारी अशी या मृत मुलांची नाव असून, हे दोघंही सोमवारी रात्री पाऊस पडत असताना भिजण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते. हे दोघंही चाळीत राहत असल्यानं या भागात पावसाचं पाणी तुंबलं होतं. त्यावेळी या मुलांना अचानक शॉक लागला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वायरमधून शॉक

पावसात भिजण्यासाठी एकूण ३ मुलं गेली होती. त्यावेळी त्या चाळीतील एक वायर तुटून ती चाळीतल्याच एका लोखंडी शिडीला चिकटली. त्यामुळं या शिडीतून आलेला शॉक लागून त्या मुलांचा मृत्यू झाला. मात्र, त्यावेळी त्यामधील एका मुलाला स्वतःचा जीव वाचवण्यात यश आलंयाप्रकरणी चाळीतील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. परंतु, घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत त्या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.



हेही वाचा -

वैद्यकीय सेवा खासगीकरणाच्या प्रक्रियेविरुद्ध कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा बस फेऱ्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा