चारकोप गाव – चारकोप गाव येथील कुंभार काळा नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम अखेर मार्गी लागणार आहे. गेली कित्येक वर्ष निधीमुळे नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम रखडले होते. स्थानिक नगरसेवक श्रीकांत कवठणकर यांच्या नगरेसवक फंडातून या भिंतीचे काम सुरू करण्यात येणार आहे. नुकताच या कामाचा शुभारंभ कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागप्रमुख वसंत गुडुळकर, मनाली चौकीदार, शाखाप्रमुख संजय सावंत, गणी शेख, सुव्हीर तावडे, सिमा लोकरे, स्वाती पोपट उपस्थित होते.