Advertisement

Landslide reported in Lavasa. पुण्यातील लवासामध्ये भूस्खलन झाल्याची माहिती.

मुसळधार पावसामुळे प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना गुरूवार २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

Landslide reported in Lavasa. पुण्यातील लवासामध्ये भूस्खलन झाल्याची माहिती.
SHARES

महाराष्ट्राच्या (maharashtra) काही भागांमध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) कोसळत आहे. या दरम्यान पुण्यातील लवासा (lavasa)भागात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक अहवालानुसार तीन ते चार लोकं यात अडकल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) एक पथक घटनास्थळी रवाना केले आहे.

गेल्या 24 तासात लवासामध्ये 417 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर लोणावळ्यात 299.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ जुन्नरमध्ये 214 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पुण्याच्या आधारवाडी परिसरात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

तसेच मुसळधार पावसामुळे प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड (pimpri chichwad) तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना गुरूवार 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

सततच्या संततधार पावसामुळे पुण्यात (pune)अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्यातील एकता नगर आणि विठ्ठल नगर भागात घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रबरी बोटींची व्यवस्था केली आहे. भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट (red alert)जाहीर केला आहे.



हेही वाचा 

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढचे काही तास धोक्याचे

मुंबई : 'मेट्रो 3'च्या कामामुळे आरेतील रस्त्याची दुरवस्था

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा