राज्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. त्यानुसार सर्व रुग्णालयांमध्ये बायोमेट्रीक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. त्याचप्रमाणे या सीसीटीव्हीतील रेकॉर्डिंगची माहिती दर आठवड्याला रुग्णालयांनी वरिष्ठ यंत्रणांना द्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत.
राज्यातील विविध भागांतील आरोग्यसेवाविषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी या सूचना केल्या.
रुग्णालयातून अर्भक चोरी होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे रुग्णालयात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असलेच पाहिजेत, अशी मागणी मध्यंतरी आरोग्यासंदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने देखील महापालिकेला सर्व प्रसुतीगृह आणि दवाखान्यात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र एका पहाणीत महापालिकेच्या 18 प्रसुतीगृहांमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले होते. म्हणूनच अशा घटना टाळण्यासाठी सर्व रुग्णालयांत सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत.
हे देखील वाचा -
महापालिकेच्या 18 प्रसुतीगृहांमध्ये अजूनही सीसीटीव्ही नाहीत
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)