Advertisement

न्या. नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती


न्या. नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
न्यायमूर्ति नरेश हरिश्चंद्र पाटिल
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश हरिश्चंद्र पाटील यांचीच मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने अधिसूचना काढल्यानंतर बुधवारी राष्ट्रपतींनी न्या. पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक केली.


यापूर्वी यांचीही नेमणूक अशीच

उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक करण्याची पद्धत आहे. मात्र न्यायमूर्ती पाटील त्याला अपवाद ठरले आहेत. यापूर्वी १९९४ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांचीही मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्यात आली होती.


२००१ पासून कार्यरत

न्यायमूर्ती पाटील मूळचे लातुरचे आहेत. ते मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. ऑक्टोबर २००१ पासून न्या. पाटील हे उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी कार्यरत आहेत.

न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर या निवृत्त झाल्यानंतर ४ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीचं पद रिक्त होतं. त्यानंतर न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी यांनी प्रभारी न्यायमूर्तीपदी कार्यरत होत्या. दरम्यान त्यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर न्या. पाटील प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपद सांभाळत होते.


म्हणून त्यांचीच नेमणूक

न्या. पाटील यांच्या निवृत्तीसाठी एक वर्षाहूनही कमी कालावधी शिल्लक आहे. ते एप्रिल-२०१९मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्त होण्यापूर्वी प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपद सांभाळत असलेल्या न्यायमूर्तींचीच अन्य राज्यांतील उच्च न्यायालयाऐवजी त्याच न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी निवड केली जाते. त्यानुसार ही निवड करण्यात आल्याचं कॉलेजियमने नुकतंच आपल्या शिफारशीत स्पष्ट केलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा