Advertisement

पोलिसांची बघ्याची भूमिकाच ठरली जीवघेणी, पबमध्ये रात्री २ वाजेपर्यंत सुरु असायचा धांगडधिंगा

जेव्हा जेव्हा पोलीस आपलं कर्तव्य विसरून केवळ बघ्याच्या भूमिकेत शिरतात, तेव्हा तेव्हा कमला मिल्ससारख्या जीवघेण्या आगीच्या घटना घडतात. पोलिसांनी नियमबाह्यपणे चालणाऱ्या या पबवर वेळीच कारवाई केली असती तर अनेकांचा जीव वाचला असता.

पोलिसांची बघ्याची भूमिकाच ठरली जीवघेणी, पबमध्ये रात्री २ वाजेपर्यंत सुरु असायचा धांगडधिंगा
SHARES

कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं, नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करणं पोलिसांचं खरं काम. पण जेव्हा जेव्हा पोलीस आपलं कर्तव्य विसरून केवळ बघ्याच्या भूमिकेत शिरतात, तेव्हा तेव्हा कमला मिल्ससारख्या जीवघेण्या आगीच्या घटना घडतात. पोलिसांनी नियमबाह्यपणे चालणाऱ्या या पबवर वेळीच कारवाई केली असती तर अनेकांचा जीव वाचला असता.

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊडमध्ये नवीन पब, बार आणि रेस्टारंट सुरू होत असल्याने कंपाऊंडच्या मोकळ्या जागांमध्ये संबधित मालकाच्या मर्जीनुसार अनधिकृत बांधकामं सुरू होती. एकप्रकारे पोलिसांना चरण्यासाठी आयती कुरणं तयार होत होती. त्यामुळेच पोलिसांसमोर अनधिकृत कारभार सुरू असला, तरी पब मालकांवर कारवाई करण्यास ते टाळाटाळ करायचे.


पोलिस बंदोबस्तात ‘धांडगधिंगा’

आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच दर विकेंडला कमला मिल कंपाऊडमध्ये पार्टींची धमाल असायची. अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मोजोस ब्रिस्टो लाऊंजने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. बसल्या जागी हुक्का, मद्य आणि लज्जतदार जेवणाची रेलचेल असल्याने इथं कायम गर्दी असायची.


'वूमन लास्ट नाइट'

शुक्रवार शनिवार, रविवार या दिवशी इथं कायम गर्दी असायची. पबने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर 'वूमन लास्ट नाइट'चं आयोजन केले होतं. ही नाईट सर्वांच्याच आकर्षणाचा विषय होती. त्यामुळे जसजशी थर्टी फर्स्ट जवळ येऊ लागली. तसतशी पबमधील गर्दीही वाढायला लागली.


तल्लीन होऊन पबमध्ये वा पबमधून बाहेर पडणाऱ्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायम कमला मिल कंपाऊंडबाहेर पोलिसांची गाडी उभी असली तरी त्यांच्या उपस्थितीत रात्री २ वाजेपर्यंत मोठ्या डिजे पार्टी रंगायची. नशेत असलेले अनेक कपल अंधारात अश्लील कृत्य करायचे. पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सर्व प्रकार होत असताना पोलीस हे दृष्य पाहून न पाहिल्यासारखे करायचे.


नियम काय सांगतो?

नियमानुसार मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या बांधकाम आणि अग्निसुरक्षा अटींचं पालन व्हायला हवं. रात्री १२ वाजेनंतर कुठलंही हाॅटेल, रेस्टाॅरंट, बार आणि पब्सना मद्यविक्रीची तसंच आस्थापनाा सुरू ठेवण्याची परवानगी नाही. 


वरिष्ठांचे लागेबांधे

तरीही रात्री उशिरपर्यंत सुरू असलेल्या या धांगडधिंग्यासाठी पोलिसांना दरमहा लाखो रुपये मिळत असल्याने पोलिस त्याकडे दुर्लक्ष करायचे. एवढंच नव्हे, तर पबमधील कुठल्याही अवैध प्रकारांवर कारवाई न करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने कनिष्ठांना एका कोपऱ्यात जाऊन उभं राहण्यावाचून पर्याय नव्हता.



हेही वाचा-

पब मालक फरार... लूक आऊट नोटीस जारी!

वाढदिवस ठरला 'खुशबूचा' मृत्यूदिवस!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा