Advertisement

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात कंगनाकडून याचिका मागे, पालिकेकडे केला अर्ज

कंगना आता फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदेशील बांधकामांना परवानगी मिळवण्यासाठी पालिकेकडे अर्ज करणार आहे.

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात कंगनाकडून याचिका मागे, पालिकेकडे केला अर्ज
SHARES

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं कंगना रणौतच्या खार इथल्या घरातील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबद्दल नोटीस बाजवली होती. या नोटीस विरोधात कंगनानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता तिनं ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कंगना आता फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदेशील बांधकामांना परवानगी मिळवण्यासाठी पालिकेकडे अर्ज करणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत कंगनाच्या वकिलांनी ही माहिती मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. यानंतर उच्च न्यायालयानं सांगितलं की, पालिकेला चार आठवड्यांत कंगनाच्या अर्जावर निर्णय द्यावा लागेल, तोपर्यंत संबंधित कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.

अलीकडेच पालिकेनं कंगना रणौतच्या पाली हिल जवळील कार्यालयाच्या कथित बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोजर चढवला होता. त्यानंतर, मुंबईतील खार इथल्या कंगनाच्या फ्लॅटमध्ये केलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामांबाबतही पालिकेनं नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात पालिकेनं सांगितलं की, कंगनाच्या ऑफिसपेक्षा तिच्या घरातच नियमांचं अधिक उल्लंघन झालं आहे. कंगना रणौत खार वेस्टच्या १६ क्रमांकाच्या रोडवरील DB Breeze या इमारतीच्या ५व्या मजल्यावर राहते. या मजल्यावर कंगनाचे एकूण 3 फ्लॅट आहेत. ८ मार्च २०१३ रोजी या तिन्ही फ्लॅटची नोंद कंगनाच्या नावावर झाली आहे.



हेही वाचा

'या' कारणास्तव कंगना रणौत ट्विटरला ठोकणार रामराम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा